Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बहुचर्चित पवना कृषक सहकारी संस्थेची निवडणूक व मतमोजणी आणखीन पुढे ढकलण्यात आली आहे. संस्थेची निवडणूक 5 एप्रिल रोजी होणार होती. पंरतु, त्याच दिवशी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असल्याने पवना कृषकची निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 चे नियम 19 (5) मधील तरतुदीनुसार मंजूर निवडणूक कार्यक्रमातील मतदान तारखेत बदल करण्याचे अधिकार प्राधिकरणास आहेत. या आदेशानुसार 5 एप्रिल रोजी होणारी निवडणूक पुढे दोन दिवस वाढवून दिनांक 7 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी दिली आहे.
- पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 23 फेब्रुवारी रोजी होणार होती. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर संस्थेच्या एकूण 13 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले होते. परंतु, सर्वसाधारण खातेदार मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश गणपत माळवदकर या उमेदवाराचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी निखारे यांनी निवडणूक प्रक्रियेतील तरतुदीनुसार ही निवडणूक स्थगित केली होती. त्यानंतर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या रिंगणात 32 उमेदवार
सर्वसाधारण (जागा 8) – मारुती आडकर, भरत भोते, बबन दहिभाते, किसन घरदाळे, गणपत घारे, किसन काळे, लक्ष्मण काळे, रामजी काळे, धोंडू कालेकर, नामदेव कालेकर, राम नढे, अंकूश पडवळ, विठ्ठल पवार, भाऊ सावंत, सूर्यकांत सोरटे, आनंदा तुपे, अनिल तुपे, बाळू वाघोले, किसन वाळुंज, लक्ष्मण येवले, बाळासाहेब दळवी
महिला प्रतिनिधी (जागा 2) – लक्ष्मीबाई आडकर, शैलजा दळवी, सुशीला घरदाळे, नर्मदा कडू,
अनुसूचित जाती-जमाती (जागा 1) – अंकुश सोनवणे, दत्तात्रेय सोनवणे,
इतर मागास वर्ग (जागा 1) – भगवान आढाव, शेखर दळवी, वसंत गोसावी,
भटक्या जमाती-विमुक्त जाती (जागा 1) – बाळू आखाडे, जयश्री पवार
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा
