Dainik Maval News : तळेगाव दाभाडे औद्योगिक संघटना आणि औद्योगिक सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव एमआयडीसीतील सर्व कंपन्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण व सुरक्षा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
- औद्योगिक सुरक्षा संचनालयाच्या अतिरिक्त संचालक शारदा होंदुले, उपसंचालक तृप्ती कांबळे यांनी कारखान्यात झालेल्या अपघातांच्या अभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. एफईव्ही आणि जेसीबी कंपन्यांतर्फे सुरक्षेसंबंधी बेस्ट प्रॅक्टिस यावर मार्गदर्शन करण्यात आले.
तळेगाव दाभाडे औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षा अनु सेठी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सचिव जगदीश यादव व सदस्य विनायक साळुंखे यांनी कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतले.
स्पर्धांमधील विजेते स्पर्धक
सुरक्षा पोस्टर श्रेणी – ऐश्वर्या ढमढेरे, स्वप्नील पहाड, गजानन मुंढे व जितेंद्र राणे
सुरक्षा कविता श्रेणी – दिलीप भेले, वैशाली सोलट, राजू लगड आणि विजय पाटील
सुरक्षा घोषवाक्य श्रेणी – अमोल ठोंबरे, नजमा शेख, सत्यम लोधी आणि आदिनाथ ठोंबरे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा
