व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 20, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा ते कर्जत दरम्यान टनेल निर्माण करण्यात येणार ; रेल्वेच्या आढावा बैठकीनंतर खासदार बारणे यांची माहिती

लोणावळा, कर्जत, उरण, पनवेल विभागातील रेल्वेच्या कामांबाबत आढावा बैठक संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 2, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Mumbai Railway Department review meeting on railway works in Lonavala Karjat Uran Panvel divisions

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : घाट भागात रेल्वेचे इंजिन घासते, वेळही जातो. त्यामुळे कर्जत ते लोणावळा दरम्यान टनेल निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठीचा 2100 कोटी रुपयांचा विकास आराखडा (डीपीआर) तयार आहे. हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. हा टनेल करण्यासाठी आवश्यक ती मदत मदत करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असल्याचेही बारणे यांनी सांगितले.

  • मुंबई रेल्वे विभागाची बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत पार पडली. खासदार नरेश म्हस्के, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार श्री. चंद्रकांत हंडोरे, खासदार धैर्यशील मोहिते, मुंबईचे रेल्वे महाप्रबंधक धर्म वीर मीना, मध्य रेल प्रबंधक हिरेश मीना, उपमहाप्रबंधक के. के. मिश्रा, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त सुरेंद्र नाथ चौधरी, प्रधान मुख्य परिमंडळ प्रबंधक श्याम सुंदर गुप्ता, प्रधान मुख्य अभियंता रजनीश मथुर, मुख्य अभियंता निर्माण एन टी पी दिव्याकांत चंद्रकार, प्रधान मुख्य विद्युत अभियंता अनुप कुमार अग्रवाल उपस्थित होते.

मुंबई विभागाअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, कर्जत, उरण, नेरळ ही रेल्वे स्थानके येतात. बैठकीची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, कर्जत रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचा डीपीआर तयार आहे. ओव्हर ब्रीजच्या कामाला गती द्यावी. खोपोलीत पर्यटन मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे त्या स्थानकाचा विकास करावा. पनवेल रेल्वे स्थानक मॉडेल स्थानक बनविण्यात येणार आहे. दिवा ते उरण लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवावा. 21 भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्याला गती द्यावी. काही रेल्वे स्थानके सिडकोने उभारली आहेत. त्याची देखभाल दुरुस्ती त्यांच्या माध्यमातूनच केली जात आहे. ती स्थानके रेल्वे विभागाने ताब्यात घ्यावीत. कर्जत, नेरळ, लोणावळा रेल्वे स्थानकावर सरकते जिने, लिफ्ट अशा सुविधा निर्माण कराव्यात.

  • प्रवाशांसाठी पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा देण्यात याव्यात. कोरोना कालावधीत लोणावळा, कर्जत रेल्वे स्थानकावरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याचे थांबे बंद करण्यात आले होते. या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे द्यावेत, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. माथेरानला पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे माथेरान अमनलोज माथेरान ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जाव्यात. अमृत भारत रेल्वे अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आढावा घेतला. त्या कामाला गती देण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली आहे.

त्यावर रेल्वे संदर्भातील रखडलेली सर्व कामे वर्षेभरात मार्गी लागतील. निधीची कमतरता भासणार नाही. अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशाचा ओघ सुरूच । Pimpri Chinchwad

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
influx of party members continues under leadership of MP Shrirang Barne Pimpri Chinchwad

खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशाचा ओघ सुरूच । Pimpri Chinchwad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala-Gramin-Police

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

June 20, 2025
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

June 20, 2025
Crime

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

June 20, 2025
Shirgao Parandwadi Police Station

शिरगावमध्ये पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा । Maval Crime

June 20, 2025
Health check-up of students distribution of school supplies at Yelaghol School in Pavan Maval

पवन मावळातील येलघोल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

June 20, 2025
Publication of annual report of Shri Potoba Devasthan in Vadgaon Maval

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

June 20, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.