Dainik Maval News : तालुकास्तरीय लोकशाही दिनानिमित्त सोमवारी (दि. १९ मे) रोजी वडगाव नगरपंचायत कार्यालय येथे सर्वसामान्य तक्रारी, अडचणी यांना न्याय व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी प्रभावी उपाय योजना म्हणून बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत प्रांत अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा, उपअभियंता जि.प. बांधकाम विभाग, तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी व मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणाप्रमुख व रहिवासी नागरिक उपस्थित होते.
बैठकी दरम्यान नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. वडगाव कार्यक्षेत्रातील नाले साफसफाई, सतत वीजपुरवठा खंडित होणे, आठवडे बाजारमध्ये परप्रांतीय विक्रेते येतात त्यांचे आधार व्हेरिफिकेशन करणे, मोकाट डुक्करे यावर प्रतिबंध, ऐतिहासिक विहिरी तलाव जपणे, रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून P1-P2 पार्किंग व्यवस्था, पोटोबा मंदिराजवळील सार्वजनिक शौचालय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे इत्यादी समस्या नागरिकांनी मांडल्या.
नागरिकांनी मांडण्यात आलेल्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी नागरिकांचे निवेदन घेऊन संबधित विभागांना सूचना करण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करून केला. सदर कार्यक्रमाचे आयोजन वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश