Dainik Maval News : जमिनीच्या वादातून तीन जणांनी मिळून एकास मारहाण केली. ही घटना १६ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील मौजे आंबळे या गावात घडली.
गौतम जुगदार, प्रथमेश गौतम जुगदार, ऋषिकेश गौतम जुगदार (सर्व रा. आंबळे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमित सयाजी जुगदार (वय ४०, रा. इंद्रायणी कॉलनी, कसगाव रोड, कामशेत) यांनी सोमवारी (दि. १९) याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ड्राइव्हरला आवाज देत होते. त्यावेळी आरोपी गौतम याच्या आईने फिर्यादी यांना चहा पिण्यासाठी बोलविले. मात्र तुम्ही माझी जमीन बळकावली, त्यामुळे मी तुमच्याकडे चहा पिणार नाही, असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश