Dainik Maval News : मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविली जाईल, अशी माहिती मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश आंबेकर यांनी दिली.
- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भरत गरुड, संचालक संतोष कुंभार, सुरेश जाधव, छबुराव गायकवाड, चंद्रकांत दाभाडे, भावना ओव्हाळ, अन्वर शिकिलकर, अमित ओव्हाळ, रमेश सुतार, सहायक गटविकास अधिकारी एस. डी. थोरात, विस्तार अधिकारी मतकरी, संगणक सहायक राऊत, रमेश मानकर आदी उपस्थित होते.
‘विश्वकर्मा’ योजनेबाबत आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, लोणावळा शहर, तळेगाव दाभाडे शहर, वडगाव, कामशेतसह मावळ तालुक्यातील कुशल, पारंपरिक कारागीर आणि छोटे व्यावसायिक यांच्या बैठका घेऊन माहिती देण्यात येणार आहे.
तालुक्यामधून दोनशे कारागीर, व्यावसायिकांना प्रशिक्षण प्रतिदिन पाचशे रुपये मानधन आणि पंधरा हजार रुपयांचे व्यावसायिक साहित्य, तीन लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देणार आहे, असे अंकुश आंबेकर यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश