Dainik Maval News : सुप्रसिद्ध अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थापक सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात जैवविविधतेसाठी देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी सोमवारी विशेष बैठक पार पडली.
या बैठकीला सयाजी शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सोमटणे, गहुंजे, इंदोरी, टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री देवराईच्या सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा काळ वृक्षारोपणासाठी अतिशय अनुकूल मानला जातो. नैसर्गिक पाणी उपलब्ध असल्याने नवीन रोपे लवकर रुजतात आणि परिसरातील वनस्पती व प्राण्यांची जैवविविधता वाढीस लागते. यामुळे ऑक्सिजन निर्मितीत वाढ होईल आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागेल.
या उपक्रमातून पर्यावरण रक्षण, हरित महाराष्ट्र आणि शाश्वत विकास यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. या संपूर्ण मोहिमेबाबत आमदार शेळके म्हणाले, “पर्यावरणाविषयीची आपली संवेदनशीलता लक्षात घेता, हा उपक्रम मावळच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारा ठरेल, याचा मला अभिमान आहे.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


