Dainik Maval News : विदेशी कंपनीकडून तेल खरेदीच्या आमिषाने १९ लाख ३९ हजार ४२७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ ते २३ मे या कालावधीत गहुंजे येथे घडला. याप्रकरणी मावळ तालुक्यातील गहुंजे येथे राहणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीने रविवारी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीला स्वीडन येथील एका कंपनीला लागणारे नुपरुगा सोल्युशन तेलाची खरेदी करण्यासाठी मध्यस्थ म्हणून कमिशन देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांना कुमार एंटरप्रायजेसचे लक्ष्मी कुमार यांच्याकडून तेल खरेदी करून ते स्वीडन येथील कंपनीला पाठवण्याचे काम देण्यात आले होते. मध्यस्थी केल्यास मोठा फायदा होईल असे फिर्यादीस सांगण्यात आले. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांवर एकूण १९ लाख ३९ हजार ४२७ रुपये घेत त्यांची फसवणूक केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


