Dainik Maval News : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. ही घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे घडली. उमेश चंद्रकांत केदारी (वय २८ वर्षे, रा. पुनावळे), मंथन उर्फ गुड्डू अर्शीफ सातकर (वय २८, रा. कान्हे, ता. मावळ, जि. पुणे) आणि विशाल ज्योतीराम खानेकर (वय ३०, रा. मोहितेसाडी, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश पंढरीनाथ सावंत यांनी रविवारी (दि. १) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे घातक शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे २ लाख ५० हजार रुपये किंमतीची पाच पिस्तुल व २० हजार रुपये किंमतीची २० जिवंत काडतूस मिळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


