Dainik Maval News : वडगाव मावळ जवळील जांभूळ फाटा इथे एक वानर रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसून जखमी झाले होते. याची माहिती कमलेश लोकरे, अभिनंदन अडसुल यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी, दिगंबर पडवळ ,मयुर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वानर हे रस्त्याच्या बाजूला झाडाझुडुपात लपून बसले होते.
वानराच्या पायाला दुखापत झाली होती. याची माहिती वन विभागाला दिली, लगेचच काही वेळातच वन परिमंडळ अधिकारी एम.एस. हिरेमठ, वनरक्षक पी. कासोळे, वन रक्षक एस.मोरे हे ही घटनास्थळावर आले. वानरास वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सुखरूप पकडून पुढील उपचारासाठी पुणे येथील भुगाव रेस्कु सेंटरला पाठवले आहे.
कुणालाही असे जखमी प्राणी आढळल्यास किंवा लोक वस्तीमध्ये साप आढळून आल्यास वन विभाग 1926 किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था 9822555004 या नंबरवर फोन करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार ; नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू
– पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 32 गावांना विकासात्मक न्याय देणार ; राज्य सरकारचे आश्वासन
– विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन । Pune News