Dainik Maval News : मावळचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी, ज्येष्ठ नेते कृष्णराव धोंडिबा भेगडे यांचे सोमवारी (दि. ३० जून) रोजी निधन झाले. कृष्णराव भेगडे हे मावळातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील परिवर्तनाचे साक्षीदार आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या कुशल नेतृत्वातून मावळने राज्याच्या नकाशावर आपली ठळक छाप उमटवली.
त्यांच्या स्मृतींना अर्पण करण्यासाठी आज, शनिवार रोजी (दि. ५ जुलै) सकाळी १० वाजता नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी या सभेस उपस्थित राहून कै. भेगडे साहेबांच्या स्मृतींना उजाळा द्यावा, असे आवाहन गणेश खांडगे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्याचे नेते,मावळचे माजी आमदार ,शिक्षणमहर्षी कै. कृष्णराव धोंडीबा भेगडे पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या स्मृती मावळकरांच्या मनात कायमच घर करून राहणा-या आहे. मावळातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बदलाचे ते साक्षीदार राहिले. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मावळचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले गेले. आदरणीय कै. कृष्णराव भेगडे साहेब यांच्या प्रती व्यक्त होणे साठी मावळकरांच्या वतीने शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता शोकसभेचे आयोजन नूतन महाराष्ट्रा विद्या प्रसारक मंडळ , इंजिनिअरिंग कॅालेज सभागृह येथे करण्यात आले आहे. या सभेला उपस्थित राहून साहेबांच्या स्मृती ला उजाळा देऊ या, असे आवाहन कऱण्यात आले आहे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार ; नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू
– पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 32 गावांना विकासात्मक न्याय देणार ; राज्य सरकारचे आश्वासन
– विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन । Pune News