Dainik Maval News : पुणे जिल्ह्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले तळेगाव – चाकण – शिक्रापूर महामार्ग आणि हडपसर ते यवत महामार्गाच्या रुंदीकरणाला गती मिळाली आहे. राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला विशेष प्राधान्य दिले आहे. दोन स्वतंत्र भागांमध्ये ही विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत.
- तळेगाव – चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत चार पदरी आणि पुढे सहा पदरी रस्त्यांसाठी ३ हजार १२३.९२ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. तर, हडपसर – यवत सहा पदरी महामार्गासाठी तीन हजार १४६.८५ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या रस्त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील रहदारीला मोठा दिलासा मिळणार आहे.
तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि यवत हे परिसर औद्योगिक आणि निवासी दृष्टिकोनातून विकसित होणाऱ्या या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्र, वसाहती, आयटी हब आणि नागरी वस्त्यांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढून वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पुणे, रायगड, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यातील नागरिकांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ होणार आहे. हडपसर – यवत आणि तळेगाव – चाकण – शिक्रापूर महामार्गांच्या रुंदीकरणामुळे पुणे जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विशेषतः चाकण, शिक्रापूर, तळेगाव औद्योगिक वसाहती आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही ‘कनेक्टिव्हिटी’ अत्यंत महत्त्वाची आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे