Dainik Maval News : शाळा व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य करणे, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो कायदा २०१२) अंमलबजावणी करणे आदी विषयांवर तळेगाव कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक बोलविण्यात आली. या बैठकीस तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात, वाहतूक शाखेचे वरिष्ठ उपनिरीक्षक गणेश लोंढे, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे आदी उपस्थित होते.
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो कायदा २०१२) अंमलबजावणी करणे, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी स्थापन करणे, शाळा व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य करणे, शालेय वाहनांची सुरक्षा व नियमन, विद्यार्थ्यांच्या एकूण सुरक्षेसाठी उपाय योजना, विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक बाबी व त्यावरील दक्षता आदींवर बैठकीत सूचना देण्यात आल्या.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच उपाययोजना राबविण्याची ग्वाही दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे