Dainik Maval News : लोणावळा येथील बस स्थानकाची झालेली दूरवस्था आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची विधानभवन, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत आमदार शेळके यांनी लोणावळा बस स्थानकाच्या नूतनीकरण प्रकल्पाबाबत मंत्री सरनाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बस स्थानकाची झालेली दूरावस्था, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची सखोल माहिती आमदार शेळके यांनी सरनाईक यांना दिली. मंत्री सरनाईक यांनीही सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले आणि सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले. यासह सदर प्रकल्पाचे टेंडर प्रक्रियेत असून लवकरात लवकर त्यास मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.
लोणावळा बस स्थानकाचे रूप पालटणार
लोणावळा बस स्थानकाचे नूतनीकरण हा प्रकल्प पीपीपी (PPP) अर्थात सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर राबविण्यात येणार आहे. याशिवाय येथे स्वच्छतागृहे, कॅफेटेरिया, हॉटेल, व्यावसायिक सुविधांसह एक सुसज्ज संकुल उभारण्यात येणार आहे.
नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून आणि प्रवासातील सुविधा सक्षमपणे उभारण्यासाठी लोणावळा बस स्थानक प्रकल्पासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत, सदर प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी वेळेत पूर्ण केल्या जातील, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे