Dainik Maval News : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यटन बससेवेचा विस्तार केला आहे. नुकतीच पीएमपीएमएल प्रशासनाने पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार १८ जुलैपासून सदर बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ( PMPML Tourist Bus Pune to Lonavala )
- मावळ तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना या बससेवेचा विशेष फायदा होणार आहे. या बससेवेमुळे निसर्गरम्य लोणावळा आणि ऐतिहासिक एकविरा देवी मंदिराला भेट देणे नागरिकांना अधिक सोपे होणार आहे. पीएमपीएमएलची ही विशेष सेवा शुक्रवार, दि. १८ जुलै पासून सुरू झाली असून ‘पुणे पर्यटन’ अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
ही पर्यटन बस पुणे येथून सुटून एकविरा देवी मंदिर, कार्ला लेणी, वॅक्स म्युझियम, भुशी डॅम आणि मनशक्ती ध्यान केंद्र या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देईल. ही सर्व ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असतात. विशेष म्हणजे पर्यटकांचा प्रवास आणखी आरामदायी व्हावा यासाठी ‘वातानुकूलित ई-बस’ वापरल्या जात आहेत. ( PMPML Tourist Bus Pune to Lonavala )
ही बस सकाळी 7.30 वाजता पुण्याहून सुटेल आणि सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत परत पोहोचेल. यामुळे प्रवाशांना दिवसाभरात सर्व प्रमुख स्थळांना भेट देण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. बस पुणे स्टेशन, स्वारगेट आणि डेक्कन जिमखाना येथून या पर्यटन बसेस सुटतील. तसेच पर्यटन बसच्या या प्रवासासाठी फक्त 500 रुपये तिकीट आकारले जाईल. हा अत्यंत परवडणारा दर असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
🌄 पुणे ते लोणावळा – आता प्रवास पर्यटनाचा! 🚌✨
पीएमपीएमएलची नवी पर्यटन बससेवा सुरू!पुणेकरांनो, तुमच्या आवडत्या लोणावळा पर्यटनस्थळांना भेट देण्याची आता सुवर्णसंधी!
🔸 दि. १८ जुलै २०२५ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) लोणावळा पर्यटन बससेवा सुरू होत आहे. pic.twitter.com/p14JKdXpSU
— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) July 17, 2025
ग्रुपने सहल काढण्याचा विचार असेल तर जर 33 प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले, तर त्यातील 5 प्रवाशांना तिकीट दरात 100 टक्के सवलत मिळेल. म्हणजेच 5 जणांचा प्रवास पूर्णपणे मोफत होईल. तिकिटांचे बुकिंग सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत करता येईल. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 020-24545454 उपलब्ध आहे.
पर्यटनासाठी नवा प्रवास!
पीएमपीएमएल पर्यटन बससेवा क्र. ११ शुभारंभ. pic.twitter.com/5uhb5D9WOv— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) July 18, 2025
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी ; राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन
– लोणावळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ५६ लक्ष निधीची मंजुरी
– मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रभाग रचनेवर आक्षेप
– राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम वाळूचे ५० क्रशर्स देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती