Dainik Maval News : शिरगाव पोलीस ठाणे हद्दीत उर्से गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ गांजाची अवैध विक्री करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी करण्यात आली.
इसाक गणीभाई शेख (५२, उर्से, मावळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सोनु उर्फ सागर (भाटनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इसाक शेख याच्या ताब्यात १९ हजार ४०० रुपये किमतीचा ३८८ ग्रॅम वजनाचा गांजा, १२ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, ५० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि ४६५ रुपये रोख रक्कम असा एकूण ८१ हजार ८६५ रुपये किमतीचा माल आढळून आला.
आरोपीने हा गांजा सोनु उर्फ सागर याच्याकडून विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न