पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते, अध्यात्म आणि सहकार क्षेत्रातील जाणकार, मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर दादा भेगडे यांचे गुरुवार (8 डिसेंबर) रोजी दुःखद निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वयाच्या 75व्या वर्षी दिगंबर भेगडे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल अनेक दिग्गजांनी आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी शोक व्यक्त केला. ( Former Maval Assembly MLA Digambar Bhegde Mourning Meeting At Bhegade Lawns Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवार (11 डिसेंबर) रोजी स्व. दिगंबर भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये सकाळी 11 वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. सर्व पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शोकसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांच्याकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– इंदोरीचे उपसरपंच ते मावळचे दोनवेळा आमदार; वाचा दिगंबर भेगडे यांचा राजकीय प्रवास । Digambar Bhegade Death
– नातलग चिमुरडीवर बला’त्कार करणाऱ्या नराधमाला वडगाव मावळ पोलिसांकडून अटक; 13 डिसेंबरपर्यंत कोठडी