Dainik Maval News : किल्ले विसापूर कडे ( Visapur Fort ) जात असताना भाजे गावच्या ( Bhaje Village ) हद्दीमध्ये डोंगरावरून पाय घसरून दरीत पडल्याने एक पर्यटक गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला आहे. ही घटना शनिवारी, दिनांक 2 ऑगस्ट रोजी विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली. उंचावरून पडल्यामुळे डोक्याला गंभीर मार लागल्याने पर्यटकाचा मृत्यू झाला. ( tourist died after slipping on mountain )
अब्राहम शिन्से (वय 28, सध्या रा. बेथानी चर्च आश्रम, रामवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) असे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे. तो पुण्यात ख्रिश्चन समाजातील फादर चे शिक्षण घेत होता. सकाळी मित्रांसोबत विसापूर किल्यावर फिरण्यासाठी आला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विसापूर किल्यावर जाण्यासाठी निघाले असता भाजे लेणीच्या जवळ असलेल्या डोंगरावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन पाय घसरल्याने त्याचा दरीत पडून मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नांनी दरीत पडलेल्या अब्राहम याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने शोधून काढला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे. ( tourist died after slipping on mountain and falling into valley while going to Visapur Fort Maval )
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एच. एच. बोकड, जय पवार यांच्यासह शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाचे सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ व अशोक उंबरे यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न