Dainik Maval News : मावळ तालुक्यात प्रतिबंधित अंमली पदार्थ विक्रीची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. विशेषतः शहरी भागात अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे. नुकतेच उर्से गावच्या हद्दीत सव्वा लाख रुपयांचे मेफेड्राॅन (एम. डी) ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई सोमवारी (दि ११ ) रोजी दुपारच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीसमोरील ब्रिजजवळ करण्यात आली आहे. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. समेश राजू तिकोणे (वय. २१.राहणार. कान्हे फाटा ता.मावळ जि.पुणे ) असे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मावळ तालुक्यातील उर्से गावच्या हद्दीत असणाऱ्या फिनोलेक्स केबल कंपनीसमोर एक तरुण मेफेड्राॅन (एम. डी) हा अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी कारवाई करत तरुणाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळील ११.७५० ग्रॅम मेफेड्राॅन (एम. डी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये आरोपींकडून १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीवर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार
– पोरांनो… तयारीला लागा ! महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
– रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प पाहणी ; लाभार्थ्यांशी थेट संवाद

