Dainik Maval News : पवनानगर परिसरामध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रभातफेरी, विविध प्रकारच्या स्पर्धा, शालेय साहित्य वाटप , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय सूचनेप्रमाणे यावर्षीदेखील १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान परिसरातील शाळा, महाविद्यालये,शासकीय निमशासकीय कार्यालये,ग्रामपंचायत कार्यालये याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये हर घर तिरंगा जनजागृती रॅली, मेरी माटी मेरा देश अश्या विविध उपक्रमांचा समावेश होता.
संकल्प इंग्लिश स्कूल आणि पवना विद्या मंदिर या शाळांनी शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत संपूर्ण पवानानगर परिसरात रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.
संकल्प इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक लक्ष्मण भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पोपटशेठ कालेकर,संचालक डॉ. संजय चौधरी ,संचालिका विद्या गांधी,संचालिका कांचन भालेराव,संचालिका कविता कालेकर, प्रल्हाद कालेकर, मा.उपसरपंच अमित कुंभार,फुलाबाई कालेकर,छाया कालेकर, पोलिस पाटील सीमा यादव,नितीन बुटाला,संदीप बुटाला,सुनिल बुटाला,स्वाती भालेराव,हनुमंत राऊत,खंडू वाघमारे,शक्ति जव्हेरी,कांती देशमुख, किशोर शिर्के,मुख्याध्यापक राहुल सोनवणे आदी मान्यवर शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पवना शिक्षण संकुल पवनानगरचे ध्वजाचे पूजन उद्योजक अतुल लक्ष्मण कालेकर यांच्या हस्ते तर ध्वजारोहण व्हेंकिज इंडीया लिमिटेड कंपनीचे मॅनेजर व शाळेचे माजी विद्यार्थी विलास वाघमारे व अतुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर,प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका शितल शेटे, ग्रामसेवक शशिकिरण जाधव, माजी उपसरपंच अनिल भालेराव, सचिन मोहिते,किशोर शिर्के, शुभम कालेकर,अलताफ शेख यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहण काले मंडलाधिकारी सचिन कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव,खंडू कालेकर, कविता कालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका किरण लाहूडकर, नागनाथ चामे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उपसरपंच पालक उपस्थित होते.
पवना कृषक विकास सहकारी संस्थेचे ध्वजारोहण अध्यक्ष भाऊ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धोंडू कालेकर,बबनराव दहीभाते,केदारी बाबा, विजय भालेराव आदी उपस्थित होते.
पवना पाटबंधारे विभागाचे ध्वजारोहण शाखाधिकारी रुपेश गावित यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे पवना जलविद्युत निर्मिती केंद्र येथील ध्वजारोहण अतिरिक्त कार्यकारी अभियंता माया कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एस टी होरने, मनोज चव्हाण आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
त्याचबरोबर परिसरात ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले यामध्ये किल्ले तिकोणा गाव कामगार तलाठी अमोल कल्पे, किल्ले लोहगड तलाठी आरगडे, किल्ले विसापूर तलाठी अमोल हाजपुडे, किल्ले तुंग तलाठी राहुल डोळस,जगन्नाथ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
शेवटी काले पवनानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसचिवालयात ध्वजारोहण करण्यात आले. सध्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक असल्यामुळे येथील ध्वजारोहण ग्रामसेवक शशिकिरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News
– वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
– पुणे – लोणावळा लोकल : कोरोना काळात बंद झालेली दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी