Dainik Maval News : विधान भवन, मुंबई येथे आज (दि. 9) आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची बैठक पार पडली.
अकोला जिल्हा भेटीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटींवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. समितीने संबंधित विभागीय सचिवांची साक्ष नोंदवली.
बैठकीस प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग), अप्पर मुख्य सचिव (महसूल विभाग), उपजिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अपूर्ण राहिलेल्या कामांचा आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश समितीने दिले. याशिवाय, या कामांचा पुनश्च आढावा पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच, समितीच्या आगामी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बैठकीच्या आयोजनासंबंधी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
