Dainik Maval News : डेक्ट्रा कंपनीच्या सीएसआर निधीतून व शिव विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यात जोडलेल्या गावांमधील महिला बचत गट सदस्यांसाठी गोधडी मेकिंग, व्यवसाय उभारणी, विक्री व्यवस्थापन इ. संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यशाळेत कंपनीच्या मदतीने उपस्थित महिलांना शिवणकाम साहित्य वाटप करण्यात आले. शिव विद्या प्रतिष्ठान व सन्मान संस्थेच्या महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास प्रकल्प अंमलबजावणी अंतर्गत गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते, असे संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर यांनी सांगितले.
तसेच संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण महिला गटांना गोधडी, बेडकव्हर, बसकर, कोस्टर, टेबल रनर, पायपुसणी इत्यादी शिलाई काम प्रशिक्षण व उत्पादने निर्मिती चे काम सातत्याने केले जाते, असे प्रकल्प व्यवस्थापक संतोष वंजारी यांनी नमूद केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
