Dainik Maval News : कामशेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाला गांजा व मोबाइलसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे कामशेत-पवनानगर रस्त्यावर चिखलसेकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
पोलीस हवालदार तुषार भोईटे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीतेश ऊर्फ मनोज महेंद्र भन्साळी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) हा १८०० ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत २७ हजार रुपये) व विवो कंपनीचा मोबाइल फोन (किंमत १० हजार रुपये) असा एकूण ३७हजार रुपयांचा मुद्देमाल बेकायदा ताब्यात बाळगताना सापडला.
याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लोसरवार करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित