राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या सौजन्याने ‘ इंद्रायणी तांदूळ विक्री महोत्सव ‘ याचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील मार्केट यार्ड भागात या तांदूळ विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ( MLA Sunil Shelke Visit Indrayani Rice Sales Festival By Maval Agro In Pune City )
इंद्रायणी भात पिकाचे प्रमुख आगार म्हणून मावळ तालुक्याची ओळख आहे. ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेतून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते 11 नोव्हेंबर रोजी भात खरेदी करण्याचा मावळमध्ये शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे मावळातील बळीराजाच्या भाताला यंदा चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘अशा उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा नेहमीच प्रयत्न असेल. या महोत्सवाला नागरिकांचा देखील उदंड प्रतिसाद लाभत असून एकाच दिवसात सुमारे दहा टन तांदूळ विक्री करण्यात आली आहे. बाजारात साठ रुपयांपेक्षा अधिक भावात विक्री होणारा अस्सल इंद्रायणी तांदूळ या महोत्सवात प्रति किलो पंचावन्न रुपयांमध्ये ग्राहकांना मिळत आहे’, अशी माहिती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब @PawarSpeaks यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी तांदूळ विक्री महोत्सवास मार्केट यार्ड पुणे येथे भेट दिली.#maval #Indrayanirice #PDCCBank pic.twitter.com/FVd4UvaBkH
— Sunil Shelke (@shelkesunilanna) December 12, 2022
आमदार सुनिल शेळके यांच्यासह यावेळी माऊली दाभाडे, प्रशासक बाजार समिती मधुकांत गरड, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, बँकेचे वरिष्ठ अधिकारी नीरज पवार, शंकर वाघमारे, गणपत भानुसघरे, दत्तात्रय आंद्रे, भाऊसाहेब दाभणे, बापूसाहेब ढोरे, प्रशांत ढोरे, धर्मराज ठोंबरे, दत्तात्रय वारिंगे, संदीप शेटे, नामदेव कोंडे आदी उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Visit Indrayani Rice Sales Festival By Maval Agro In Pune City )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ परिसरात पावसाची अचानक एन्ट्री, अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
– युवासेना मावळ तालुका प्रमुखपदी विशाल हुलावळे यांची निवड
– तैलबैल येथे क्लाईम्बिंग करताना खाली पडून ट्रेकर्सचा मृत्यू, शिवदुर्गच्या जवानांनी शोधला मृतदेह