Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर देहूरोड जवळील मामुर्डी गणपती मंदिराजवळ मारुती स्विफ्ट कार ( क्र. MH 14 EH 7503) गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला आदळले. या अपघातात गाडीचा अक्षरशः चुरा झाला.
या अपघातात गाडीच्या डाव्या बाजूस असलेले सिद्धांत आनंद आणि दिव्यराज राठोड (वय 22) हे दोघे जागीच ठार झाले. तर चालकासह इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पुढील सीटवरील एका प्रवाशाला वाहनातून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र आणि पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली जवान मिलिंद पाटील, दीपक ढवळे, नितीन कोकरे, भूषण येवले, शुभम किर्वे, प्रशांत काठोळे, अर्जुन चव्हाण आदींनी मदतकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena