Dainik Maval News : प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने प्रगती विद्यामंदिर शाळेतील २४ खेळाडूंना तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये नवी उर्जा निर्माण झाली असून स्पर्धेसाठी त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे.
या कार्यक्रमास प्रगती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महादेव ढाकणे सर, क्रीडा प्रमुख नाईकरे सर, कदम सर, मिंडे सर, मकर सर, शिंदे सर, कर्डीले मॅडम, चव्हाण मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे खो-खो प्रशिक्षक सुधीर शिवेकर, वसीम तांबोळी, विठ्ठल पवार, विशाल चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रतिक्रिया देताना प्रशांत दादा भागवत म्हणाले ; “खो-खो हा आपला पारंपरिक खेळ असून मुलांनी यातून संघभावना, शिस्त आणि चिकाटी शिकावी हेच महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून पुढे यावे, यासाठी आमच्या फाउंडेशनतर्फे नेहमीच प्रयत्न सुरू राहतील. प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा असून त्यांनी उत्तम कामगिरी करून शाळेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा आहे.”
टी-शर्ट वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही प्रगती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रगती विद्यामंदिरचे सर्व शिक्षक, पालकवर्ग तसेच प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशनचे सहकार्य लाभले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena
