अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. दिनांक 9 डिसेंबरच्या रात्री झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत. यात जखमी झालेल्या भारतीय सैन्यातील 6 जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे. ( India and China troops clash on Arunachal Pradesh mountain border )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
Again our Indian Army soldiers have been provoked by the Chinese.
Our jawans fought in a resolute manner and a few of them have been injured too.
We are one with the nation on the issues of National Security and would not like to politicize it. But Modi Govt
should be honest..
1/— Mallikarjun Kharge (@kharge) December 12, 2022
प्राप्त माहितीनुसार, काही चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय सैनिकांच्या तत्परतेने चिनी सैनिकांचा प्लॅन पूर्णत्वास गेला नाही. या चकमकीत दोन्ही सैन्याचे काही जवान जखमी झाले. दरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती त्या ठिकाणचा सॅटेलाइट फोटो समोर आला आहे. ज्यात तवांगच्या सीमेजवळ चीनने गावं बांधल्याचे सॅटेलाइटच्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर त्या बाजूला चिनी सैन्याने रस्ताही बांधला आहे.
अधिक वाचा –
– आंबी पुलासाठी जलसमाधी आंदोलन, आंदोलकांनी कंबरेएवढ्या पाण्यात चार तास उभे राहून केले आंदोलन
– ‘अस्सल’ इंद्रायणी तांदूळ विक्री महोत्सवाला उदंड प्रतिसाद, एका दिवसात सुमारे 10 टन तांदळाची विक्री