Dainik Maval News : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत मावळ तालुक्यात पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
विधान परिषदेच्या मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार एक नोव्हेंबर २०२2 पर्यंत झालेले पदवीधर यांना व शिक्षक मतदार नोंदणीसाठी मागील 6 वर्षात 3 वर्ष पूर्णवेळ माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम केलेले असल्यास त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. मतदार नोंदणीसाठी अंतिम तारीख ६ नोव्हेंबर, २०२५ आहे. यापूर्वी पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी पात्र मतदारांनी अर्ज करावेत, असे आवाहन सुरेंद्र नवले यांनी केले आहे.
प्रारूप मतदार यादी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी व अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. मावळ विधानसभा मतदार संघामध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे एकूण पाच मतदान केंद्र आहेत. मतदार केंद्र क्रमांक 48-काले पवनानगर यासाठी पद निर्देशित अधिकारी गट विकास अधिकारी सुधीर भागवत, 49- खडकाळा यासाठी पद निर्देशित अधिकारी गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान, 50- लोणावळा यासाठी पद निर्देशित अधिकारी मुख्याधिकारी अशोक साबळे, 51- तळेगांव यासाठी पद निर्देशित अधिकारी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व 52- वडगांव यासाठी पद निर्देशित अधिकारी तहसीलदार मावळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी त्या त्या भागातील मतदारांची नोंदणी सुरू आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी मावळ तालुक्यामध्ये एकूण पाच पदनिर्देशित अधिकारी नियुक्त केले आहेत. पदनिर्देशित अधिकारी अर्जाची पोच देणे, अर्जावर स्वाक्षरी करणे, कागदपत्रांच्या प्रती प्रमाणित करणे आदी कामे करणार आहेत. पदवीधर मतदार नोंदणी नमुना नंबर १८ चा फॉर्म व शिक्षक मतदार संघासाठी नमुना नंबर १९ चा फॉर्म आहे, त्यानुसार पात्र मतदारांनी सहा नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावेत असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर