Dainik Maval News : आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून लोणावळा शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यासह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश सोहळा संपन्न झाला. यासह लोणावळा शहराची नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.
मनसे पक्षाचे सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, मार्गदर्शनाखाली आणि मनसे तालुका अध्यक्ष अशोक कुटे, मनसे लोणावळा शहर अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिन भांडवलकर, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया, मनसे मावळ तालुका उपाध्यक्ष मोजेस दास, मनसे मावळ उपाध्यक्ष रमेश म्हाळसकर, मनसे महिला लोणावळा अध्यक्षा संगीता गुजर यांसह पक्षाचे अनेक आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.
लोणावळा शहर नवीन कार्यकारिणी :
निखील भोसले ( अध्यक्ष ), उपाध्यक्ष पदी दिनेश बाळासाहेब कालेकर, मधुर गिरीधर पाटणकर, अभिजीत दिपक फासगे आणि विरल गाला, चिटणीस पदी शिरीष अशोक गावडे, सह संघटक पदी विपुल गणपत माने, प्रसिद्धी प्रमुख पदी आकाश अरविंद लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. यांसोबत शहरातील विभाग अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली, ज्यात ; अक्षय रवी बांदल ( भांगरवाडी ) कुलदीप सुधीर पाटणकर ( खोंडगेवाडी/गावठाण ) निलेश सुरेश लांडगे ( सिद्धार्नगर/गावठाण ) शुभम राजाराम पवार ( इंद्रायणीनगर ) जुबेर मेहबूब मुल्ला ( इंदिरानगर / न्यू तुंगार्ली ) किशोर सखाराम साठे ( जुना खंडाळा ) संकल्प शंकर खराडे ( खंडाळा ) आणि निलेश गुलाब मराठे ( भुशी रामनगर ) यांची विभागवार अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सोबत, उपविभाग अध्यक्ष संदीप दशरथ बोभाटे ( ई वार्ड सिद्धार्थ नगर गावठाण), शाखा अध्यक्ष श्रेयश शांताराम कांबळे ( सिद्धार्नगर ) संतोष रामदास येवले ( जुना खंडाळा ) अक्षय मनोहर मोरे ( भांगरवाडी ) अनिल दौलत बामणे ( इंद्रायणी नगर ) या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच सिद्धार्थ नगर शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ज्यात विनम्र विलास कदम ( शाखा उपाध्यक्ष सिध्दार्थनगर ) नितीन विनोद जवळकर (संघटक सिद्धार्थनगर ) अजिंक्य शाम बोभाटे ( गट प्रमुख सिद्धार्थनगर) आनंद प्रल्हाद बोभाटे (चिटणीस सिध्दार्थनगर ) आणि साहिल हसन सांडे (प्रसिध्दी प्रमुख सिद्धार्थनगर) यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर