Dainik Maval News : अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नजरेच्या टप्प्यात आल्या आहेत. नगर पंचायत, नगर परिषदा यांच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या आहेत. सोबत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या आरक्षण सोडती देखील सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर ) जाहीर झाल्या आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार ) पक्षाने आज, मंगळवार (दि. १४ ) रोजी पदाधिकारी – कार्यकर्ता यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह जवळील मंडपात ही बैठक होणार आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद इमारत उद्घाटन सोहळा या अनुषंगाने ही खास बैठक आयोजित केली आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता, आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मावळ तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, सुकाणू समिती (मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ), लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूरोड, कामशेत, देहू शहर येथील सर्व पदाधिकारी, तसेच महिला, युवक, विद्यार्थी, सर्व सेल अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व समर्थक यांनी वेळेवर उपस्थित राहावे, अशी माहिती तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी