Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक करिता गट निहाय आरक्षण सोडत सोमवारी ( दि. १३ ऑक्टोबर ) जाहीर झाली. यात मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरला आहे. यानंतर या गटात आता राजकीय चर्चांना उधाण आले असून प्रशांतदादा भागवत यांच्या पत्नी मेघाताई प्रशांतदादा भागवत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. “कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही!” असा ठाम निर्धार करून मेघाताई भागवत यांनी आपली तयारी सुरु केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रशांतदादा भागवत आणि मेघाताई भागवत यांनी मावळ तालुक्यातील जनतेसोबत सातत्याने जनसंपर्क ठेवला असून, खासकरून महिलांच्या हितासाठी विविध उपक्रम आणि भव्य कार्यक्रम राबविले आहेत. ‘मनोरंजन संध्या’, ‘कुंकू मार्चन सोहळे’, महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले उपक्रम आणि सामाजिक कामातून त्यांनी आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.
स्थानिक पातळीवर मेघाताई भागवत यांचा महिलांमध्ये मोठा संपर्क असून महिला वर्गात त्या अधिक लोकप्रिय आहेत. सोबत प्रशांतदादा भागवत यांनी केलेल्या विकासकामांचा आणि सामाजिक उपक्रमांचा फायदा आता मेघाताईंना निवडणुकीत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“मेघाताई भागवत यांनी ही निवडणूक लढवून विजय संपादन करण्याचा निर्धार केला आहे,” अशी माहिती त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिली. मावळ तालुक्याच्या राजकारणात यानंतर नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा