Dainik Maval News : विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, पुणे जिल्हा यांच्यावतीने विद्यादानाचे मौल्यवान कार्य करणाऱ्या संस्थाचालक, शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालक प्रतिनिधी यांच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) या विषयावर केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे मार्गदर्शन सत्र आणि पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार 2025 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमांमध्ये विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान यांच्यावतीने पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत असलेल्या १५ शैक्षणिक संस्थांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये ज्ञानश्री शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे संचलित ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहूंजे ( ता. मावळ जि. पुणे ) या शाळेस शैक्षणिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याबद्दल केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते “पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार 2025” देऊन गौरवण्यात आले.
पुरस्कार घेण्याकरीता ज्ञानश्री शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अॅड. निखिल बोडके, संचालिका पौर्णिमा बोडके, संचालिका हर्षाली बोडके, ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल विजीला राजकुमार उपस्थित होते. सदर कार्यक्रम ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाकरिता मा.डॉ. सुरेश तथा नानासाहेब जाधव (प्रांत संघचालक, पश्चिम महाराष्ट्र, रा.स्व. संघ), मा.मुकुंदराव कुलकर्णी(विभाग कार्यवाह, रा.स्व. संघ), मा.रघुनाथ देवीकर (प्रांत मंत्री, विद्याभारती), तसेच पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मा.डॉ.अशोक नगरकर (अध्यक्ष विद्याभारती पुणे जिल्हा) व त्यांचे कार्यकारणी च्या वतीने करण्यात आले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा