व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुरीचे पिक संकटात, अळीचा प्रादुर्भाव वाढला, प्रशासनाकडून शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन

सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 15, 2022
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Tur-Crop

Tur Crop File Image


सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शेतकऱ्यांनी या किडींवर वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे. ( Tur Crop In Crisis Worm Prevalence Increased Administration Appeals To Farmers To Take Measures )

काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास 70 टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांनी पाने व फुलांची जाळी करणारी अळीची प्रादुर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीराहीत नष्ट करून शेंगा पोखरणारी अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा. तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत व निरिक्षण करावे.

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी उभारावेत. पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क 5 टक्केची किंवा अझेंडीरॅक्टिन 300 पीपीएम 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची 5 मिली 10 लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 5, एसजी 4.4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2 मिली किंवा क्लोरेनट्रीनीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 9.3 + लॅमडा साहॅलोथ्रीन 4.6 झेडसी 4 मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मारुका इंडोक्झाकार्ब 14.5 एससी 8 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीन पट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– बनावट लेटरहेड तयार करून वन्यप्राणी पकडण्यासाठी रक्कम मागितल्याप्रकरणी आरोपीला अटक
– मोठी बातमी! ‘कुणीही लगेच दावा सांगू नका’, सीमावादावर अमित शाहांच्या दरबारी तात्पुरता तोडगा, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

बनावट लेटरहेड तयार करून वन्यप्राणी पकडण्यासाठी रक्कम मागितल्याप्रकरणी आरोपीला अटक

Next Post

पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Death

पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा 'असा' शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.