Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वरुन लोणावळ्याकडे येणारे हायवा वाहन (क्रमांक एमएच-14/एचयू-0567) हे वलवण एक्झिट येथील उतार व वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी दुभाजक तोडून पलटी झाले. या भीषण अपघातात वाहनाखाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.
महादेव कांबळे (वय 50, सध्या रा. कुसगाव बुद्रूक, लोणावळा, ता. मावळ, मूळ रा. लातूर) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. चालकाने गाडीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचदरम्यान वाहनाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवार (दि. 15 ऑक्टो) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे तसेच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृत चालकाला बाहेर काढले. अपघातग्रस्त हायवा क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा