Dainik Maval News : काले – कुसगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी पक्षाचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ज्ञानेश्वर दळवी यांचा गावभेट संवाद दौरा सध्या सुरू असून त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतीच ज्ञानेश्वर दळवी यांनी काले गणातील चावसर, केवरे, मोरवे, चाफेसर आणि कोळे या गावांना भेट दिली आणि येथील नागरिकांशी आपुलकीचा संवाद साधला.
पवन मावळातील पश्चिम पट्ट्यातील या गावांना जेव्हा ज्ञानेश्वर दळवी यांनी भेटी दिल्या, त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. सर्वप्रथम चावसर व केवरे गावांना त्यांनी भेट दिली. चावसर – केवरे ग्रामस्थांसोबत संयुक्त बैठक घेत त्यांच्या पूनर्वसन व अन्य समस्यांची माहिती जाणून घेतली आणि त्यांच्या समस्या योग्य प्रकारे सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शहाजी गोणते, नवनाथ गोणते, अनिल मानकर, दत्ता दळवी, संजय गोणते, अशोक गोणते, संतोष राऊत, तुकाराम गोणते, अर्जुन उंबरकर, श्रीपती गोणते, दत्ता गोणते, संतोष गोणते, रवी गोणते, चिंधू गोणते, सदाशीव गोणते, हनुमंत गोणते, हनुमंत मानकर आदी ग्रामस्थ, महिला भगिनी यावेळी उपस्थित होते.
मोरवे गावातही स्थानिक नागरिकांसोबत ज्ञानेश्वर दळवी यांनी आपुलकीचा संवाद साधला. याप्रसंगी गोविंदराव गाऊडसे, ज्ञानेश्वर गाऊडसे, बंडू गाऊडसे, सुरेश गाऊडसे, नामदेव गाऊडसे, किसन आखाडे, चंद्रकांत वांजळे आदी मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी उपस्थित होत्या.
चाफेसर गावाला भेट देत असताना ज्ञानेश्वर दळवी यांनी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली आणि शालेय विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी केल्या. तदनंतर थेट शेताच्या बांधावर जात महिला शेतकऱ्यांसोबत आपुलकीचा संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी पाड्यावर जात आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. यावेळी आदिवासी बांधवांनी दळवी यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी उद्योजक गोविंद कोकरे, शंकर पोळ, प्रमोद शिंदे, बबन वाघमारे, सुभाष वाघमारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोळे गावात ग्रामदैवत श्री वाघोबा देवाच्या वार्षिक यात्रा व काकडा आरती समाप्ती निमित्त आयोजित हभप कृष्णा महाराज पडवळ यांच्या काल्याच्या कीर्तनाला ज्ञानेश्वर दळवी उपस्थित राहिले व विठ्ठल भक्तांसह हरिनाम गजरात दंग झाले. याप्रसंगी ग्रामस्थांनी दळवी यांना सन्मानित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पांडुरंग जांभुळकर, एकनाथ जांभुळकर, विनायक जांभुळकर, दत्तोबा जांभुळकर, गोरख जांभुळकर, नामदेव जांभुळकर, दामु जांभुळकर, झांजु वाघमारे, गबळु काळे, तानाजी काळे, शहाजी काळे, हभप भिकाजी तुपे यांसह गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी हे भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी तालुक्यात तसेच पवन मावळ विभागात केलेल्या कामांची चर्चा आजही होत आहे. सोबत या भागातील नागरिकांच्या सुख – दुःखात सामील होणारे नेतृत्व म्हणून ज्ञानेश्वर दळवी यांच्या बद्दल स्थानिकांमध्ये आत्मियता आहे. आता जेव्हा ज्ञानेश्वर दळवी हे काले – कुसगाव गटातून जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत, तेव्हा नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांना नागरिकांचा पाठींबा मिळताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

