Dainik Maval News : नगरपंचायत , नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मावळ तालुक्यात लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहे. दरम्यान तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळ नगरपंचायतीची निवडणूक स्वबळवार लढविण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
शुक्रवारी ( दि. ७ नोव्हेंबर ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जांभुळ फाटा येथे मेळावा झाला. प्रमुख पदाधिकारी, नेते यांच्या या मेळाव्याला आमदार सुनील शेळके यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान मेळाव्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी वडगाव नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळवार लढणार असल्याचे जाहीर केले.
वडगाव नगरपंचायतीच्या सतरा नगरसेवक आणि जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबरला मतदान होत असून १० नोव्हेंबरापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. दरम्यान निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून आज स्वतः आमदार शेळके यांनी वडगावात कुठल्याही युतीची शक्यता न वर्तविता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वबळाची घोषणा केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
