Dainik Maval Newa : राज्यात लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष या अनुषंगाने तयारीला लागले आहेत. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट असून या पाचही गटांपैकी सर्वाधिक चुरस ही काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटात असणार आहे. याच गटात सध्या भारतीय जनता पार्टीचे जुणे – जाणते आणि निष्ठावंत कार्यकर्ते असणारे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होत आहे.
दळवी यांच्या संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्ञानेश्वर उर्फ माऊली पांडुरंग दळवी हे आपल्या शेकडो विश्वासू सहकाऱ्यांच्या जोरावर आणि हजारो मायबाप जनतेच्या पाठींब्याने जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहे. या अनुषंगाने नुकताच त्यांनी गावभेट संवाद दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्वच गावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच गावागावात महिला – पुरुष ग्रामस्थांच्या उपस्थित संवाद बैठकी पार पडल्या. ज्यातून नागरिकांची ज्ञानेश्वर दळवी यांच्या नावाला संमती मिळताना दिसून आले.
उच्चशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार
एक उच्चशिक्षित, स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आणि काले – कुसगाव बुद्रुक गटातील प्रश्न – समस्या यांची जाण असणारा आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी योग्य धोरण असणारा नेता म्हणून ज्ञानेश्वर दळवी यांचा चांगलाच बोलबाला आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असले तरीही ज्ञानेश्वर दळवी यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची सलोख्याचे संबंध आहे. यातुनच भविष्यात काले – कुसगांव गटाच्या विकासासाठी आवश्यक ती कार्य करण्याचा निर्धार दळवी व्यक्त करीत आहेत.
काले – कुसगांव गटातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
ज्ञानेश्वर दळवी यांनी पंचायत समितीचे सभापती असताना संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी योगदान दिले. पवन मावळ विभागातील अनेक पायाभूत सोयी-सुविधांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आताही काले – कुसगांव जिल्हा परिषद गटाच्या विकासाचे धोरण त्यांनी निश्चित केले असून त्यांच्या परिपूर्तीसाठी ते नागरिकांकडे आशीर्वाद मागत आहे. सामान्य मतदार देखील त्यांना आशीर्वाद देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यासह काले – कुसगांव गटात ज्ञानेश्वर दळवी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर सामान्यांचा भक्कम पाठींबा त्यांना मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

