Dainik Maval News : बांगलादेशातून एजंटांच्या माध्यमातून आणलेल्या १३ वर्षीय मुलीला डांबून ठेवले. तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिस अन्य सात आरोपींच्या शोधात आहेत.
याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी जहीरूल उर्फ सूरज जमाल इस्माल (आसाम) याला अटक केली. त्याला गुरुवारी (दि. ६) वडगाव मावळ न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘या मुलीला ब्युटी पार्लरचे काम मिळवून देतो, म्हणून तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने एजंटांच्या माध्यमातून कोलकतामार्गे भारतात पाठवले. त्यानंतर मुलीला मावळ तालुक्यातील आंबी येथील एका सदनिकेत डांबून ठेवले.
सूरजने मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेत, पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

