Dainik Maval News : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत मावळ तालुक्यातील ऐश्वर्या नवनाथ कार्ले हिने पहिल्याच प्रयत्नात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये हे यश संपादन करणारी ऐश्वर्या ही यंदा एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिने आपले प्राथमिक शिक्षण सेंट माऊंट ऍन स्कूल आणि उच्च शिक्षण गरवारे महाविद्यालय, पुणे येथे पूर्ण केले.
अभ्यासात सातत्य, आईचे मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळाल्याचे ऐश्वर्या हिने सांगितले. “ध्येय निश्चित केल्यावर प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याचेच हे फळ आहे,” असे ती म्हणाली. ऐश्वर्याच्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतूक होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

