Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत.
हे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. या तारखांना पुन:श्च मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Warkari Accident

