Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुधवारी ( दि. 12 ) पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. तालुकाध्यक्ष गणेश खाडगे यांनी ही यादी प्रसिद्ध केली. त्यावेळी आमदार सुनील शेळके उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार जाहीर करण्यात आले असून ते सर्व घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद : NCP पहिली यादी
प्रभाग 1 मधून आशा अशोक भेगडे, प्रभाग 2 मधून संदीप बाळासाहेब शेळके, प्रभाग 3 मधून सिद्धार्थ गोरख दाभाडे, प्रभाग 4 मधून गणेश मोहनराव काकडे, प्रभाग 5 मधून भारती सुरेश धोत्रे, प्रभाग 7 मधून सत्यम गणेश खांडगे, प्रभाग 9 मधून हेमलता चंद्रभान खळदे, प्रभाग 10 मधून संगीता सतीष खळदे आणि प्रभाग 12 मधून संतोष छबुराव भेगडे या उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती गणेश खाडगे यांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke
– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News
– खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Accident

