Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महायुतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
भारतीय जनता पार्टीचे दीपक भेगडे, शोभा परदेशी आणि निखिल भगत हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादीच्या हेमलता खळदे बिनविरोध निवडून आल्या आहेत. चारही उमेदवारांचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी अभिनंदन केले आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी १३४ उमेदवारी अर्ज आले होते. या अर्जांची मंगळवारी छाननी संपन्न झाली. यामध्ये जवळपास पन्नास उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान १९ ते २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज घेण्याची मुदत आहे. त्यांनतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
