Dainik Maval News : कार्ला येथील आई एकवीरा देवी पायथ्याशी असणाऱ्या वेहेरगाव – दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी उपसरपंच सुनील येवले यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाकरिता वेहरगाव च्या सरपंच अर्चना देवकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रकिया राबविण्यात आली.
याप्रसंगी निर्धारीत वेळेमध्ये गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच देवकर व सहायक अधिकारी ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी अनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड जाहीर केली. वेहरगाव सरपंच अर्चना देवकर, माजी उपसरपंच सुनील येवले, ग्रामपंचायत सदस्य राजूदेवकर, शंकर बोरकर,सदस्या पूजा पडवळ, काजल पडवळ, वर्षा मावकर हजर होत्या.
उपसरपंचरदी गायकवाड यांची निवड झाल्यानंतर या सर्वांनी त्यांचा सत्कार केला. माजी सरपंच गणपत पडवळ, माजी उपसरपंच द्रौपदा ताई गायकवाड,मधुकर पडवळ, संजय देवकर, सागर देवकर, सुरेश गायकवाड, दत्तात्रय पडवळ, किरण येवले, महादू गायकवाड, सुनील गायकवाड, सुरेश गायकवाड, गौतम गायकवाड, योगेश गायकवाड व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
