Dainik Maval News : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटातील जांभूळ गावातील भेटीदरम्यान मेघाताई भागवत यांना ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भेटीगाठी दरम्यान वडीलधारी मंडळी तसेच माता–भगिनींनी मेघाताईंना मनापासून आशीर्वाद देत येणाऱ्या निवडणुकीत ठाम पाठींबा जाहीर केला. “आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत, तुम्हाला पूर्ण ताकद देऊ”, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त करताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मेघाताई भागवत गेल्या काही दिवसांपासून गावोगावी दौरे करत असून प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळणारा प्रचंड रिस्पॉन्स हा निवडणुकीचे वातावरण त्यांच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. जांभूळ गावातील ग्रामस्थांचे प्रेम, विश्वास आणि उर्जा पाहून मेघाताई स्वतःही भारावून गेल्या असून, “याच ताकदीवर आम्ही बदल घडवू,” असे त्यांनी सांगितले.
इंदोरी–वराळे गटातील सद्य परिस्थितीवर नजर टाकली असता, महिला वर्ग तसेच अनुभवी ग्रामस्थांचा मिळणारा प्रामाणिक पाठिंबा हा मेघाताई भागवत यांच्या प्रचाराला नवीन उभारी देत आहे. गावांतून उमटणारा मजबूत प्रतिसाद आणि नागरिकांचा जिव्हाळा पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताईंची लाट असल्याचे चित्र आता अधिक स्पष्टपणे दिसू लागले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade

