Dainik Maval News : जिल्हा परिषद निवडणुकीत इंदोरी–वराळे गटातील राष्ट्रवादी काँग्रे पार्टी पक्षाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांच्या जनसंपर्क दौऱ्याला माळवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
“येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. ग्रामस्थांचे प्रेम, आदर आणि विश्वास पाहून मेघाताई भावुक झाल्या. ग्रामस्थांनी दिलेल्या ऊर्जेने निवडणुकीच्या शर्यतीत नवचैतन्य मिळाल्याचे भागवत यावेळी म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेघाताई भागवत यांचा जनसंपर्क अलीकडच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आमदार सुनील शेळके यांचाही त्यांच्यावर ठाम विश्वास आहे. मनमिळावू, शांत आणि समंजस स्वभावामुळे गावोगावी त्यांना महिलांकडून, युवा वर्गाकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
इंदोरी–वराळे गटात मेघाताई भागवत यांच्यासाठी अनुकूल राजकीय वातावरण निर्माण झाले असून लोकाभिमुख कामांची माहिती गावागावांत वेगाने पोहोचत आहे. वाढत चाललेला पाठिंबा आणि ग्रामस्थांचा आत्मीय प्रतिसाद पाहता, येणाऱ्या निवडणुकीत मेघाताई भागवत या दमदार स्पर्धक म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
