Dainik Maval News : तळेगाव दाभाडेजवळील सोमाटणे फाटा येथे गुरुवारी (दि. 27) भल्या पहाटेच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोमाटणे फाटा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे.
सोमाटणे टोलनाका जवळ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या युनिट २ आणि कुख्यात गुन्हेगारांमध्ये चकमक झाली. यात गोळीबार होऊनही पोलिसांनी धाडस दाखवत संशयितांच्या टोळीला चक्क टोलनाक्यावर घेरले आणि तीन जणांना जेरबंद केले.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे तसेच घरफोडीतील मौल्यवान असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींपैकी एकावर ‘मोक्का’ लागू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे तळेगाव परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याचा बंदोबस्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
