Dainik Maval News : राज्यातील 29 महानगरपालिकांकरिता गुरुवारी (दि.15) मतदान पार पडले होते, त्या मतांची आज (दि.16) मोजणी होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे असून यातील विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष जरी मुंबईच्या निकालाकडे असले तरीही मावळवासियांचे लक्ष मात्र मावळचा लेक लढत असलेल्या मुंबईतील प्रभाग क्रमांक 4 कडे लागलेले होते. आणि याठिकाणाहून आता आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविलेले मंगेश पांगारे यांनी दणदणीत विजय संपादित केला आहे. मंगेश पांगारे हे मूळ मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील पारिठेवाडी या गावचे आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल पारिठेवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण मावळवासियांकडून अभिनंदन केले जात आहे. यासोबतच मुंबई डबेवाल्यांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेत प्रथम नगरसेवक होण्याचा बहुमान देखील पांगारे यांनी मिळविला असून शिवसेना – भाजपा युतीचे विजयी नगरसेवक म्हणून ते थेट पालिकेच्या सत्ताधारी बाकावर बसणार आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
