जुण्या मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत सीआरपीएफ गेट 2 जवळ झालेल्या रस्ते अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल भा.दं.वि. 304 (अ), 279 सह 134, 184 मो.वा.का. मधील अनोळखी मृतासाठी शोधपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. ( An Unidentified Person Died In Road Accident Near CRPF Gate In Talegaon Dabhade City Limits )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास जुण्या मुंबई पुणे महामार्गावर सीआरपीएफ गेट 2 जवळ अज्ञात वाहनाची धडक बसून अनोळखी व्यक्ती मृत्यू झाला आहे. या मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन खालील प्रमाणे,
वय – 30 ते 35 वर्षे
रंग – काळा सावळा
उंची – 165 सें.मी.
बांधा – मध्यम बांधा
अंगावर कपडे – काळसर रंगाची पॅन्ट, चॉकलेटी रंगाचा सॅन्डो बनियन
सदर व्यक्तीची ओळख पटत असल्याच किंवा नातेवाईक असल्यास सदर प्रकरणाचे तपास अधिकारी के.एस. पठारे (स.पो.नि.) 88888109597 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– मोरवे गावातील महिलांकरिता मसाला बनवण्याचे कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम
– अपघाताची बातमी! जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा घाटात टेम्पो उलटला