पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची महा ई-ग्राम सिटीझन कनेक्ट मोबाईल ॲपवर नोंदणी झाल्याने नागरिकांना आता मोबाईलमध्येच दाखले मिळत आहेत. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाने अॅप सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंत 1 हजार 384 ग्रामपंचायतींनी या ॲपवर नोंदणी केली आहे. ( Pune District Gram Panchayat Get certificate online )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ॲपमधून कोणते दाखल मिळतात?
जन्म-मृत्यू नोंदीचा दाखला, विवाह नोंदीचा दाखला, दारिद्यरेषेखालील दाखला, मिळकतीचा उतारा आदी दाखल्यांसाठी मागणी ॲपमधून करता येईल. आपल्या कराचा भरणा करून रितसर पावती मिळवू शकता. यामुळे करवसुली जलदगतीने होऊन ग्रामपंचायत उत्पन्नामध्ये भर पडत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीला सूचनादेखील नोंदवणे शक्य होते आहे.
आतापर्यंत एवढ्या नागरिकांनी केली नोंदणी…
तालुका – ग्रामपंचायती – नोंदणी संख्या
आंबेगाव – 103 – 542
बारामती – 98 – 835
भोर – 156 – 891
दौंड – 80 – 2,327
हवेली – 71 – 730
इंदापूर – 116 – 441
जुन्नर – 143 – 594
खेड – 162 – 1,068
मावळ – 103 – 1,149
मुळशी – 92 – 710
पुरंदर – 93 – 1,171
शिरूर – 96 – 669
वेल्ह – 71 – 563
एकूण – 1384 – 11,680
अधिक वाचा –
– महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी
– बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी इंदोरीतील दोन जणांना अटक, पोकलेन-ट्रॅक्टर जप्त