पुण्यात होणाऱ्या ‘जी-20’ परिषदेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सायकल फेरीच्या माध्यमातून ‘जी-20’ बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.
सुमारे पंधराशे सायकलप्रेमी नागरिक या सायकल फेरीत सहभागी झाले होते. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते. या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी आणि महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) संतोष वारुळे यांनी केले. ( Bicycle Marathon In Pune In Wake Of G-20 Summit )
अधिक वाचा –
– व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले
– बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ